बंद

  २८.०१.२०२० राज्यपालांच्या हस्ते प्रेम चोप्रा यांना जीवन गौरव पुरस्कार

  प्रकाशित तारीख: January 28, 2020

  उदित नारायण, अमीशा पटेल, धीरज कुमार, डॉ इंदू शहानी ड्रीम अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित

  राज्यपालांच्या हस्ते प्रेम चोप्रा यांना जीवन गौरव पुरस्कार

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार प्रेम चोप्रा यांना मंगळवारी (दि २८ जाने) जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

  पार्श्वगायक उदित नारायण, अभिनेत्री अमीशा पटेल, धीरज कुमार, मुंबईच्या माजी नगरपाल डॉ इंदू शहानी, भारत पाक युध्दातील वीर सेनानी मेजर जनरल जी.डी. बक्षी, भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी शाहिदा गांगुली यांसह इतर नामांकित व्यक्तींना “ड्रीम अचिव्हर्स” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाना नानी फाउंडेशन तसेच फिल्म्स टूडे यांच्या वतीने हे पुरस्कार देण्यात आले.

  कार्यक्रमाला नाना-नानी फाउंडेशनचे विश्वस्त श्याम सिंघानिया, पदम सिंघानिया व आशा लाल प्रामुख्याने उपस्थित होते.