बंद

    १८. ०१. २०२० राज्यपालांनी केले ‘चाणक्य वार्ता’ महाराष्ट्र विशेषांकाचे प्रकाशन

    प्रकाशित तारीख: January 18, 2020

                                                                  राज्यपालांनी केले ‘चाणक्य वार्ता’ महाराष्ट्र विशेषांकाचे प्रकाशन

    ‘चाणक्य वार्ता’ या हिंदी पाक्षिकाच्यामहाराष्ट्र विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि.१८) राजभवन येथे करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते चित्रपट निर्माते मुकेशभट, पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘आचार्य चाणक्य सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीनारायण भाला, केंद्रीय हिंदी संचालनालयाचे संचालक अवनीश कुमार, संपादक डॉ. अमित जैन, लेखिका आशा सिंग देवसी आदि उपस्थित होते.   ‘चाणक्य वार्ता‘च्या महाराष्ट्र विशेषांकात राज्याची संस्कृती, ऐतिहासिक, धार्मिक व इतर प्रेक्षणीयस्थळे, दुर्ग व किल्ले, राज्यातील महापुरुष, बॉलीवूड, शेअर बाजार इत्यादीगोष्टींची माहिती देण्यात आली आहे.