बंद

    १८. ०१. २०२० राज्यपालांच्या हस्ते डॉ. अरुणा ढेरे, प्रमिलताई मेढे यांनाडी.लिट. 

    प्रकाशित तारीख: January 18, 2020

                                        एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचा ६९ वा पदवीदान संपन्नराज्यपालांच्या हस्ते
    डॉ. अरुणा ढेरे, प्रमिलताई मेढे यांनाडी.लिट.  

    ज्येष्ठ साहित्यिक डॉ अरुणा ढेरे तसेच राष्ट्र सेविकासमितीच्या चतुर्थ संचालिका प्रमिलताई मेढे यांना राज्यपाल तथा कुलपती भगतसिंहकोश्यारी यांच्या हस्ते डॉक्टर ऑफ लेटर्स (डी.लिट.) देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या आजझालेल्या ६९ व्या पदवीदान समारंभात ही मानद पदवी देण्यात आली. यावेळी विद्यापीठाच्या १३९०४ स्नातक विद्यार्थिनींना पदवी, पदव्युत्तर पदवी, आचार्य पदवी तसेच सुवर्णपदकेप्रदान करण्यात आली.   चित्रकूट येथील उद्यमिता विद्यापीठाच्या संस्थापक संचालिकाडॉ. नंदिता पाठक, कुलगुरू डॉशशिकला वंजारी, प्र-कुलगुरू विष्णु मगरे, ठाकरसी परिवरातील सुधीर ठाकरसीयावेळी उपस्थित होते.