बंद

  १२९ व्या आंबेडकर जयंती निमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन

  प्रकाशित तारीख: April 14, 2020

  १२९ व्या आंबेडकर जयंती निमित्त

  राज्यपालांचे महामानवाला अभिवादन

  राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपली आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी दीपप्रज्वलन करून महामानवाला अभिवादन केले.

  राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक बादल कुमार, खाजगी सचिव उल्हास मुणगेकर यांचेसह राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपली आदरांजली वाहिली.

  *