बंद

  ११.०२.२०२० कायदेविषयक पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

  प्रकाशित तारीख: February 11, 2020

                                                       कायदेविषयक पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

  औरंगाबाद, दि. ११ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कायदेविषयक पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या इमारतीचे उद्घाटन कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याहस्ते आज झाले. सुरूवातीला श्री.कोश्यारी यांनी कोनशीलेचे अनावरण केले. त्यानंतर फीत कापून इमारतीचे उद्घाटन केले.

  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचे (एनसीएल) प्रा. अश्विनीकुमार नांगिया, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, प्र. कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, विभागाच्या प्रमुख डॉ. साधना पांडे, व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य किशोर शितोळे, सहयोगी प्राध्यापक डॉ.आनंद देशमुख, उपअभियंता श्री.क्षीरसागर आदींसह विद्यापीठातील शिक्षक- शिक्षणेत्तर अधिकारी, कर्मचारी, वरिष्ठ महसूल अधिकारी यांची उपस्थिती होती.

  इमारतीमध्ये प्रशस्त वर्ग खोल्या, कार्यालय, अभिरूप न्यायालय, परिषद आयोजनासाठी सभागृह, ग्रंथालय, वाचन कक्ष, संगणक प्रयोगशाळा आदींची व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेली आहे.