बंद

  ३०.०१.२०२० हुतात्मा दिनानिमित्त राजभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली

  प्रकाशित तारीख: January 30, 2020

  हुतात्मा दिनानिमित्त राजभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली

  हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज भवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली.

  देशाच्या स्‍वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो.

  यावेळी राज्यपालांचे सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी , राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखिल दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांचे स्मरण केले.