बंद

  स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपालांचे कार्यक्रम

  प्रकाशित तारीख: August 14, 2019

  भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव पुणे येथील कौन्सिल हॉल येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देतील.
  स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांनी राज्यातील सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

  राज्यपालांचे चहापान रद्द

  राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्यपालांनी राजभवन पुणे येथे होणारा चहापानाचा कार्यक्रम रद्द केला आहे. हा कार्यक्रम पुणे येथील राजभवन येथे दिनांक १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी होणार होता.

  दरवर्षी होणार्‍या या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमाला स्वातंत्र्य संग्राम सैनिक, पद्म पुरस्कार विजेते, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, सशस्त्र सेना दल, पोलीस तसेच नागरी सेवेतील ज्येष्ठ अधिकारी, पत्रकार तसेच मान्यवर निमांत्रित केले जातात. यावर्षी सदर चहापान रद्द करण्यात आले आहे.