बंद

  संगीताच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पोहचवा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  प्रकाशित तारीख: February 21, 2020

  ठाणे दि.21 जिमाका : संगीत हे समाजामध्ये संदेश देण्याकरीता सकारात्मक प्रभावी माध्यम असुन या माध्यमाच्या द्वारे स्वच्छतेचा संदेश पोहचणे आवश्यक असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले
  संस्कृती आर्ट फेस्टीवल चे संचालक तथा आमदार प्रताप सरनाईक यांनी उपवन येथे गायक कैलास खैरे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.
  यावेळी अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,ठाणे महापौर नरेश म्हस्के,आमदार प्रताप सरनाईक,विभागीय आयुक्त शिवाजी दौड,जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर,पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिवाजी राठोड,आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

  संगीत व गीत ऐकल्याने दैनदिंन तान तनाव कमी होते.या संगीताचा उपयोग सकारात्मक संदेश जनतेमध्ये पोहचविल्यावर जनता त्यावर सकारात्मक प्रतिसाद देते असेच स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहचविण्याचे काम या संगीताच्या माध्यामातून संस्कृती आर्ट फेस्टीवल करणार आहे.

  देशातील गावामध्ये सुध्दा स्वच्छेचा संदेश पोहचला असून त्यामुळे कुटुबाच्या आरोग्याला कोणताही धोका उद्भवणार नाही असे ही कोश्यारी यांनी सांगितले. जिल्ह्यातील आदिवासी गावातील बाधवांच्या घरात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता अप्रतिम स्वच्छता त्या घरात दिसून आली असेही राज्यपाल यांनी सांगितले.जिल्हातील खेळाडू संजिवकुमार सिंह यांना राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी शिव गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत केले.
  संस्कृती आर्ट फेस्टीवलने विविध स्टॉलचे आयोजन केले होते.या स्टॉलला राज्यपाल श्री कोश्यारी यांनी भेट देऊन पाहणी केली.