बंद

    शिवाजी विद्यापीठाचा ५६ वा दीक्षांत समारंभ

    प्रकाशित तारीख: February 6, 2020

    06.02.2020: राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा ५६ वा दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी 60 हजार 167 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.