बंद

  ०४.०१.२०२० विकास मंडळांचे प्रस्ताव मंजूर करण्याच्या राज्यपालांच्या मानव विकास आयुक्तांना सूचना

  प्रकाशित तारीख: January 4, 2020

  विकास मंडळांचे प्रस्ताव मंजूर करण्याच्या राज्यपालांच्या मानव विकास आयुक्तांना सूचना

  राज्यातील विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांना यावर्षी देण्यात आलेला प्रत्येकी ५० कोटी रुपयांच्या विशेष निधीचा पूर्ण विनियोग होण्याचे दृष्टीने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. ४) राजभवन येथे तिन्ही मंडळांचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त व सदस्य सचिव यांची आढावा बैठक घेतली.

  मंडळांच्या विशेष निधीतून मागास तालुक्यांमधील मानव विकास निर्देशांक वाढविण्याच्या दृष्टीने मंडळांनी सादर केलेल्या प्रस्तावांना त्वरित मंजुरी देण्याची सुचना राज्यपालांनी यावेळी मानव विकास आयुक्त तथा औरंगाबादचे विभागीय आयुक्त एस.एम. केंद्रेकर यांना दिल्या.

  बैठकीला विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, विभागीय आयुक्त, कोकण शिवाजीराव दौंड, नाशिकचे विभागीय आयुक्त पी.आर. माने, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजय कुमार, अमरावतीचे विभागीय आयुक्त पियुष सिंग तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.