बंद

  राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री यांचेकडून राज्यपालांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

  प्रकाशित तारीख: February 12, 2019

  राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अनेक मान्यवरांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे त्यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची राजभवन येथे भेट घेउन राज्यपालांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

  पर्यटन मंत्री जयकुमार रावल, राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ योगेश जाधव, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, आदी मान्यवरांनी राज्यपालांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

  तमिलनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, आसामचे राज्यपाल जगदीश मुखी, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, उदयोगपती मुकेश अंबानी यांनी देखील पत्र पाठवून राज्यपालांचे अभिनंदन केले.