बंद

  राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील जल किरण नुतनीकृत अतिथिगृहाचे उद्घाटन संपन्न

  प्रकाशित तारीख: August 17, 2019

  राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील

  जल किरण नुतनीकृत अतिथिगृहाचे उद्घाटन संपन्न

  मुंबई दि. 17 :- राजभवनातील जल किरण या जवळपास दिडशे वर्षाचा इतिहास असलेल्या अतिथीगृहाच्या नुतनीकृत वास्तुचे उद्घाटन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
  यावेळी राज्यपाल चे.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे, राष्ट्रपतींच्या पत्नी श्रीमती सविता कोंविंद, राज्यपालांच्या पत्नी श्रीमती विनोदा व राष्ट्रपती महोदयांच्या सुकन्या स्वाती कोविंद आदी उपस्थित होते.
  जल किरण ही वास्तू ऐतिहासिक आहे. या अतिथीगृहात राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांचे निवासस्थानी अतिथी कक्ष तयार करण्यात आला आहे. या जलकिरणचे नुतनीकरण करण्यात आले आहे.

  ऐतिहासिक तोफा कोनशिला अनावरण

  राजभवनात 2018 साली सापडलेल्या दोन भव्य अशा ब्रिटीशकालीन तोफा जलविहार हॉलसमोर दर्शनी भागात ठेवण्यात आल्या असून त्याच्या कोनशिलेचे अनावरण देखील राष्ट्रपती महोदयांनी यावेळी केले.या ऐतिहासिक जुन्या तोफांचे महत्व लक्षात घेता राज्यपाल महोदयांच्या पुढाकाराने त्यांचे जतन करणार येत आहे. या तोफांचे वजन प्रत्येकी 22 टन, लांबी 4.7 मीटर तर अधिकतम व्यास 1.15 मीटर असा आहे.
  राजभवनास भेट देणाऱ्या लोकांना तसेच इतिहासप्रेमी अभ्यासकांना या तोफा पाहता येतील.