बंद

  राज भवन येथे स्वयंचिकीत्सा शिबीर संपन्न

  प्रकाशित तारीख: November 5, 2019

  अंतिम दिनांक:31.12.2019

  राज भवन येथे स्वयंचिकीत्सा शिबीर संपन्न

  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि ५ नोव्हे) राजभवन येथे ‘स्वयंचिकित्सेतून विकारांचे व्यवस्थापन’ या विषयावरील प्रशिक्षण व आरोग्य शिबिर संपन्न झाले.

  लायन्स क्लब ऑफ ॲक्शन संस्थेचे अध्यक्ष गिरधारीलाल लुथरिया यांनी स्वयंचिकित्सेच्या माध्यमातून अशक्तपणा, वेदना तसेच विकार यांमधुन मुक्ती या विषयावर प्रात्यक्षिकांसह विवेचन केले.

  कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब तथा विश्व सिंधी सेवा संगमचे अध्यक्ष डॉ राजू मनवाणी, डॉ जिगर चावडा, डॉ जेनिथ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.