बंद

    राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी घेतली राष्ट्रपतींची सदिच्छा भेट

    प्रकाशित तारीख: December 28, 2018

    राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राजभवन, मुंबई येथे राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांची सदिच्छा भेट घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. नरेश पाटील हे देखील उपस्थित होते.

    सांताक्रुझ येथील योग संस्थेच्या शताब्दी समारोहासाठी तसेच अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजिन या संस्थेद्वारे आरोग्य सेवा परिषदेच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती मुंबई भेटीवर आले होते.

    यावेळी झालेल्या चहापानाला राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविन्द, राज्यपालांच्या पत्नी विनोदा व मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील उपस्थित होत्या.