बंद

  राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्यध्वजारोहण

  प्रकाशित तारीख: August 15, 2019

  महाराष्ट्र शासन
  विभागीय माहिती कार्यालय,
  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
  नवीन मध्यवर्ती इमारत, तळ मजला,
  ससुन रुग्णालयासमोर, पुणे – 411 001.

  राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते

  पुणे विधानभवन प्रांगणात मुख्यध्वजारोहण

  स्वातंत्र्य सैनिक व उपस्थितीतांना दिल्या शुभेच्छा..

  पुणे दि 15 : भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापनदिन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात पार पडला. पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बरोबर नऊ वाजता त्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले.

  यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माजी मंत्री खासदार गिरीश बापट, संजयकाका पाटील, संजय काकडे, अमर साबळे, माजी राज्यमंत्री आमदार दिलीप कांबळे, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे, कृषी आयुक्त सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे महानगर पालिका आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी नवलकिशोर राम ,पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे, जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

  ध्वजारोहणानंतर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.याशिवाय अन्य मान्यवर व अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या .

  राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते वृक्षारोपण

  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते आज सकाळी राजभवन येथे वृक्षारोपण करण्यात आले.
  यावेळी पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, उपसचिव रणजितकुमार, खासदार संजय काकडे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.