बंद

    राज्यपाल कोश्यारी यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

    प्रकाशित तारीख: December 27, 2019

    राज्यपाल कोश्यारी यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

    पंढरपूर दि.27 – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. विधिवत पुजेनंतर राज्यपाल कोश्यारी यांचा विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.

    यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, शिवाजी मोरे, संभाजी शिंदे, यांच्यासह मंदिर समितीचे इतर कर्मचारी उपस्थित होते.