बंद

    राज्यपालांसंदर्भात बदनामीकारक वृत्त प्रसारित केल्या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल

    प्रकाशित तारीख: May 14, 2020

    राज्यपालांसंदर्भात बदनामीकारक वृत्त प्रसारित केल्या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे संदर्भात खोटे व बदनामीकारक वृत्त वेबपोर्टलवर प्रसिद्ध करून समाज माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी आज राज्यपालांचे वतीने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथील मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे कक्ष येथे तक्रार नोंदविण्यात आली.

    एका मॉडेल अभिनेत्रीसाठी विशेष पासची व्यवस्था करून देऊन महाराष्ट्रातून दिल्लीमार्गे देहरादून येथे प्रवास करण्यास मदत केल्याचे असत्य व बदनामीकारक वृत्त सदर वेबपोर्टलने प्रसिद्ध केले होते, या संदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली.