बंद

    २५.०१.२०२० राज्यपालांच्या हस्ते २६ वे सोल लायन्स क्लब सुवर्ण पुरस्कार

    प्रकाशित तारीख: January 25, 2020

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज देशासाठी प्राणांची आहुति देणार्‍या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना २६ वे सोल लायन्स क्लब सुवर्ण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एक लाख रु. आणि मानचिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते.

    मुंबईतील एनएमआयएमएस विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला मुख्य प्रवर्तक लायन डॉ. राजू मनवाणी, सोल लायन क्लब पदाधिकारी व सदस्य तसेच निमंत्रित उपस्थित होते.