बंद

    राज्यपालांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या १०० व्या पुस्तकाचे प्रकाशन

    प्रकाशित तारीख: January 29, 2020

    मुंबई विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अभ्यासमंडळाने तयार केलेल्या १०० व्या पुस्तकाचे, Taxonomy of Chordates चे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. अभ्यासक्रमावर आधारीत संदर्भ पुस्तके तयार करून परवडेल अशा कमी किमतीत उपलब्ध करून देत असल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले. यावेळी कुलगुरू सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू रविंद्र कुलकर्णी, विनायक दळवी, विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक – लेखक व विद्यार्थी उपस्थित होते.