बंद

    07.01.2021 : राज्यपालांच्या हस्ते पावनधाम कोविड केंद्रातीलडॉक्टरांचा सत्कार

    प्रकाशित तारीख: January 7, 2021

    राज्यपालांच्या हस्ते पावनधाम कोविड केंद्रातीलडॉक्टरांचा सत्कार
    बंट संघ, मुंबई व बिल्लावा संस्थेच्या आजी माजीअध्यक्षांचा सत्कार

    करोना संसर्गाच्या काळात बोरीवली येथे कोविडसेवा केंद्र स्थापन करून सामान्य जनतेला अत्यल्प दरात सेवा देणाऱ्या पावनधाम कोविड केंद्रातील डॉक्टर्स  व समाज सेवकांचा राज्यपालभगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी राजभवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी बंटसंघ मुंबई तसेच बिल्लावा संस्थेच्या आजी व माजी अध्यक्षांचा देखील राज्यपालांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याचे आयोजन पावनधाम, पोईसर जिमखाना तसेच इतरसंस्थांनी केले होते. कार्यक्रमाला खासदार गोपाल शेट्टी, आमदार पराग शहा, भारतीय विकास संस्थांचेअध्यक्ष योगेश दुबे, बंट संघ मुंबईचे अध्यक्ष पद्मनाभ पय्याडे व इतर मान्यवरउपस्थित होते.