बंद

  राज्यपालांचे जनतेला ‘मेरी क्रिसमस’

  प्रकाशित तारीख: December 24, 2019

  अंतिम दिनांक:31.12.2019

  राज्यपालांचे जनतेला ‘मेरी क्रिसमस’

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व लोकांना नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

  राज्यातील तसेच देशातील माझ्या सर्व नागरिक बंधू –भगिनींना मी नाताळनिमित्त ‘मेरी क्रिसमस’ शुभेच्छा देतो.

  प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या प्रेम, दया आणि सद्भावाच्या चिरंतन संदेशाचे चिंतन करण्याचे हे पर्व आहे. नाताळचा सण राज्यातील सर्व लोकांना आनंद, शांती व संपन्नता प्रदान करो, या शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.