बंद

    राज्यपालांची कर्मचाऱ्यांच्या नवरात्री मंडळाला भेट

    प्रकाशित तारीख: October 7, 2019

    राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सोमवारी (दि ७) राजभवन कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक नवरात्र मंडळाला भेट देऊन कर्मचाऱ्यांसमवेत देवीची आरती केली.

    राज्यपालांनी यावेळी उपस्थितांची विचारपूस केली, तसेच कर्मचारी व त्यांच्या कुटूबिंयाना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. राजभवन सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ गेल्या ५७ वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा करीत आहे.