बंद

    १६.०१.२०२० युवकांनी शूरवीर बनून समाजहितासाठी कार्य करावे : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: January 16, 2020

    विले पार्ले येथील संन्यास आश्रमाचा अमृत महोत्सवयुवकांनी शूरवीर बनून समाजहितासाठी कार्य करावे : राज्यपाल

          संन्यासआश्रम चांगला असला तरीही प्रत्येकाने सन्यासी होऊन चालणार नाही. धर्माशिवाय राष्ट्र चालत नाहीतसेच राष्ट्राशिवाय धर्म वाढत नाही. यास्तव ‘वीरभोग्यावसुंधरा‘ उक्तीप्रमाणे युवकांनी शूरवीरबनून राष्ट्रधर्म वाढविण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीआज येथे केले.विलेपार्ले येथील संन्यास आश्रमाच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटनराज्यपालांच्या उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते.धर्म म्हणजे आदर्श मूल्यांकरिता जगणे, इतरांचा आदर करणे व चारित्र्य घडवणे, असे सांगून धर्माचे संस्कार युवा पिढीला दिल्यास चारित्र्यसंपन्नयुवक तयार होतील, असे त्यांनी सांगितले.   राष्ट्रदेवो भव ही संकल्पना पुरातन काळापासून आपल्या देशात आहे.त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी भारत प्रांताप्रांतांमद्धे विभागला होता व ब्रिटीशांमुळेतो एकत्र झाला, ही धारणा अत्यंत चुकीची असल्याचेत्यांनी सांगितले. सधन लोकांनी आपल्या संपत्तीचे मालक न होता विश्वस्त जाणिवेनेसमाजासाठी धन वापरले पाहिजे, असे त्यांनी संगितले. आज शिक्षण म्हणजे केवळ रोजगाराचे साधन असे समीकरण झाले असतानासंन्यास आश्रम येथे आधुनिक शिक्षणासोबत  वैदिकशिक्षण देत धर्म जागरण व श्रद्धा जागृतीचे कार्य करीत असल्याबद्दल राज्यपालांनी समाधानव्यक्त केले.संन्यास आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरि यांनी आश्रमातर्फे केल्या जाणार्‍या धर्म, संस्कृतीव समाजकार्याची माहिती दिली. आमदार मंगलप्रभात लोढा, आमदारपराग अळवणी,  स्वामी शुकदेवानंद, स्वामी प्रणवानंद, स्वामीअखंडानंद, गायिका अनुराधा पौडवाल आदि मान्यवरउपस्थित होते.