बंद

    मुंबई विद्यापीठाचे पन्नासावे क्रमिक पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

    प्रकाशित तारीख: July 23, 2018

    मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या पन्नासाव्या क्रमिक पाठ्यपुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते सोमवारी (दि. २३) राजभवन येथे झाले. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी, कुलपतींचे व्यवस्थापन परिषदेवरील प्रतिनिधी दीपक मुकादम, ‘अॅनिमल फिजिओलॉजी’ या प्राणीशास्त्र विद्याशाखेच्या पुस्तकाचे लेखकत्रय विनायक दळवी, कॅप्टन निलिमा प्रभू व मृणालिनी कागवाडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.