बंद

  मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा शपथविधी येत्या रविवारी

  प्रकाशित तारीख: April 5, 2019

  मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नंदराजोग येत्या रविवारी (दिनांक ७) सकाळी १०.३० वाजता पदाची शपथ घेणार आहेत.

  राज्यपाल चे. विद्यासागर राव न्या. नंदराजोग यांना राजभवन येथील जल विहार सभागृहात पदाची शपथ देतील.

  न्या. प्रदीप नंदराजोग सध्या राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.

  मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश न्या. नरेश पाटील दिनांक ६ एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.