बंद

  महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

  प्रकाशित तारीख: April 5, 2020

  महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वांना महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

  महावीर जयंतीचा पवित्र दिवस भगवान महावीरांचे दिव्य जीवन कार्य तसेच त्यांच्या अहिंसा, भूतदया व अनेकांतवादाच्या शिकवणीचे स्मरण देतो. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपण प्रेम व सद्भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करूया. सर्व नागरिक बंधु-भगिनींना मी महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

  ***