बंद

    बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: May 6, 2020

    बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

    भगवान बुद्धांच्या अहिंसा, शांती, करुणा व मानवतेची सेवा या शाश्वत शिकवणीने भारतीय सामाजिक – सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आहे व अनेक पिढ्यांचे समाजमन घडविले आहे. आज जग एका कठीण परिस्थितीतून जात असताना ही शिकवण सर्वांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल. बुद्धपौर्णिमेच्या या मंगल प्रसंगी मी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.