बंद

    बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: August 11, 2019

    महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील लोकांना बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

    बकरी ईद (ईद उल झुहा) हा पवित्र सण पूर्ण श्रद्धा व समर्पण भावनेचा संदेश देतो. हा सण साजरा करताना दानधर्म तसेच उपेक्षित वर्गाच्या कल्याणाचा उदात्त विचार केलेला आहे. बकरी ईदच्या सणानिमित्त मी राज्यातील लोकांना विशेषतः मुस्लीम बंधू – भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.