बंद

  पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पाला भेट

  प्रकाशित तारीख: March 5, 2020

  पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पाला भेट

  पालघर जिल्ह्यातील भालीवली येथे विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटर संचालित राष्ट्र सेवा समितीच्या आदिवासी विकास प्रकल्पाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज भेट दिली.

  यावेळी प्रकल्पातील बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आदिवासी महिलांना राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

  कार्यक्रमाला विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटरचे पालक रमेश पतंगे, संचालक प्रदीप गुप्ता, दिलीप करंबेळकर व किरण शेलार, विश्वस्त दिलीप सपकाळ, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक गौरव सिंह, विद्यार्थी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.