बंद

    पारशी नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: August 16, 2018

    राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला पारशी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या सामाजिक – आर्थिक – वैचारिक जडणघडणीत पारशी समाजाचे योगदान फार मोठे आहे. हा दिवस “उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती” या त्रिसुत्रीचे स्मरण देतो. मी राज्यातील जनतेला आणि विशेषतः पारशी बंधू – भगिनींना नवरोझ तसेच पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.