बंद

  नेदरलँड्सच्या शाही दांपत्यांचे राज भवन येथे स्वागत

  प्रकाशित तारीख: October 17, 2019

  नेदरलँड्सच्या शाही दांपत्यांचे राज भवन येथे स्वागत

  नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांनी आज गुरुवारी (दि १७) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी शासनाच्या वतीने राज्यपालांनी शाही दांपत्यांचे स्वागत केले.

  नेदरलँडमध्ये अनेक भारतीय वंशाचे लोक राहत असून तेथील उदयोग, माहिती तंत्रज्ञान क्षोत्रात योगदान देत असल्याचे राजे विलेम-अलेक्झांडर यांनी सांगितले. भारतीय योग नेदरलँडमध्ये अतिशय लोकप्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कृषी व फलोत्पादन पायाभूत सुविधा, जागतिक पर्यावरणातील बदल, सांस्कृतिक संबंध या विषयांवर चर्चा झाली.

  महाराष्ट्र औदयोगिक क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी देशातील सर्वांत पसंतीचे राज्य असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

  बैठकीनंतर राज्यपालांनी शाही दांपत्यांना राजभवन परिसराची सैर करविली.