बंद

  नविकरणीय ऊर्जा क्षेत्रात अमेरिकेने सहकार्य करावे – राज्यपाल

  प्रकाशित तारीख: August 13, 2019

  महान्यूज

  नविकरणीय ऊर्जा क्षेत्रात अमेरिकेने सहकार्य करावे

  – राज्यपाल

  मुंबई, दि. 13 : राज्यासाठी आवश्यक असणाऱ्या नविकरणीय ऊर्जा क्षेत्रात अमेरिकेकडून सहकार्याची अपेक्षा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. अमेरिकेचे वरिष्ठ काँग्रेस सदस्य जॉर्ज होल्डींग, ल्युई फ्रॅन्केल, श्रीमती ज्युलीया ब्राऊनली, जो विल्सन यांनी राजभवन येथे राज्यपालांची आज सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राजशिष्टाचार व पर्यटनमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.

  राज्यपाल श्री.राव म्हणाले, राज्य अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे, नाविन्यपुर्ण तंत्रज्ञान आणि सुधारणांचा राज्याच्या प्रगतीसाठी अंगिकार केला जात आहे. यासाठी विविध देशातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. राज्यात उद्योगांतील गुंतवणूकीसाठी पुरक वातावरण आहे. वर्ल्ड बॅंकेतर्फे देण्यात येणारे इज ऑफ डुईंग अंतर्गत देशात राज्याचे मानांकन सुधारले आहे. राज्याने 65 क्रमांक वर जात 77 वे स्थान मिळविले आहे. सर्वात जास्त मोठे उद्योग राज्यात कार्यरत आहेत. गुंतवणूकीसह, पर्यटन, सांस्कृतिक आणि शैक्षणिक सहकार्याच्या अनेक संधी राज्यात उपलब्ध आहेत. अमेरिकेतील 30 लाख भारतीयांमुळे देशाच्या उभारणीत योगदान मिळत असल्याचेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

  उभय देशातील संबध अधिक दृढ होण्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.