बंद

  ज्वेलरी व्यवसायात महिला उद्योजिकांचा सहभाग वाढावा -राज्यपाल

  प्रकाशित तारीख: October 1, 2018

  इंडियन ज्वेलर्स विकचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

  ज्वेलरी व्यवसायात महिला उद्योजिकांचा सहभाग वाढावा

  -राज्यपाल

  सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच नियमित मासिक गुंतवणूक करून ग्राहकांनी या क्षेत्रात गुंतवनूक वाढवावी यासाठीही इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने प्रोत्साहित केले पाहिजे. भारतीय ज्वेलर्सनी जागतिक दर्जाची ज्वेलरी बनवून विश्वास, सौंदर्य आणि परवडण्यासारखे दागिने म्हणूनयासाठी एक ब्रँड म्हणून पुढे यावे. नैतिकतेने व्यवसाय करून जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवावा असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

  इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही 99 वर्षं जूनी संस्था आहे. देशातील सोन्याचे दर ठरविण्यात या संघटनेचीमहत्वपुर्ण भूमिका आहे.सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सुमारे 150 दुकानदार आणि 12000 व्यापारी सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनातून होणाऱ्या विक्रीतून राज्याला 500 कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मिळणे अपेक्षित आहे.

  या वेळी आमदार राजपुरोहित, श्री. मोहित कम्बोज यांचीही समयोचित भाषणे झाली. या वेळी या महोत्सवाच्या लोगोचे तसेच एका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.