बंद

  जैवविविधता

  प्रस्तावना

  मोरफुलपाखरू

  मलबार हिल हे, वनस्पतीजातींची व प्राणीजातींची विविधता असलेले एक जंगल क्षेत्र होते. महाराष्ट्र राज्य राजपत्र खंड-1, बृहन्मुंबई जिल्हा यानुसार, “मलबार हिलच्या उतारावर घनदाट जंगल होते आणि खारफुटी व बाभूळ वनस्पतींमधून जाणारी मलबार हिल ते गावदेवी ही, शिद्धी म्हणून ओळखली जाणारी एक पायवाट जाण्या-येण्यासाठी आहे.” आणखी असेही नमूद केले आहे की, “वाळकेश्वर रस्ता अर्धा चढल्यानंतर, शासकीय निवासस्थानाच्या दिशेने जाणारा एक रूंद उतरणीचा रस्ता जेथे एकत्र येतो तेथील उर्ध्व रस्त्याच्या कडेला सुयोग्यपणे लावलेली झाडे, झुडुपे व वेली आच्छादित होती. हा रस्ता पहिल्यांदा लॉर्ड एलफिन्स्टन यांनी 1853-1860 मध्ये बांधला होता.” परंतु नागरीकरणामुळे प्रवेश करण्यास निर्बंध असल्यामुळे जेथे पोहोचणे अवघड होते असे राजभवन आणि एका विशिष्ट समुदायासाठी खुले असलेल्या कमला नेहरू पार्क जवळील “शांती मनोरा (टॉवर ऑफ सायलेंन्स)” यांसारख्या क्षेत्रांखेरीज मलबार हिल येथील जंगल प्राय: दिसेनासे झाले आहे.

  राजभवन क्षेत्रात अजूनही जुन्या जंगलाचे अवशेष आहेत.

  राजभवन क्षेत्रात दिसून आलेल्या वनस्पती जाती व प्राणीजाती यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  वनस्पती

  वनस्पती
  अभ्यासातून असे आढळून आले की, सध्या पारोसा पिंपळ (थेसपेसिया पॉप्युलेना) हा वृक्ष, संपूर्ण क्षेत्रामधील एक महत्वाचा वृक्ष आहे. लागवडीनंतर या वृक्षांची फारशी काळजी घेण्याची गरज नसल्याने ओसाड जमीन वृक्षाच्छादित करण्यासाठी वेगाने वाढणाऱ्या या प्रजातींची लागवड केली गेली होती अशी शक्यता असू शकते आणि म्हणूनच ते अल्पावधीतच सर्वत्र क्षेत्रात पसरलेले असू शकतात. पारोसा पिंपळ (थेसपेसिया पॉप्युलेना) या वृक्षाची नैसर्गिक पुननिर्मिती खूप कमी असल्याचे समजते. पारोसा पिंपळ (थेसपेसिया पॉप्युलेना) आणि करंज (पोंगामिआ पिन्नाटा) हे वृक्ष, खारफुटीचे (मॅनग्रोव्हजचे) खूप चांगले सहयोगी आहेत आणि म्हणून ते सर्व- समुद्रकिनाऱ्यावर आढळून येतात. .

  वनस्पती

  या क्षेत्रात, बॉमबॅक्स सेईबा (रेड सिल्क कॉटन), भुत्या (स्टेरकुलिया युरेन्स) (घोस्ट ट्री), एस.व्हिल्लोसा, पांगारा (एरीथ्रिना व्हॅरिएगाटा) (इंडियन कोरल ट्री), मोवई (लॅन्नेआ कोरो मंडेलिका) (शेमॅट), ताड (बोरासस फ्लॅबेलीफर), ताडी पाम (टोड्डी पाम), उंबर, औदुंबर (फिकस रॅसेमोसा) अंजीर (फिग), काटेबोर (झिझफस माऊरिटायना) (बेर), कनक चंपावर्ग (प्टेरोस्पेरमम ॲसेरिफोल्युम), साग (टेक्टोना ग्रँन्डीस) यांसारख्या वृक्षांच्या काही दुर्मिळ प्रजाती होत्या तर, खारगोल (कारगोळा) (ट्रेमा ओरिएंटॅलिस) (चारकोल ट्री), आली (मोरिंडा ब्रॅक्टेटा) (बारतोंडी), थोरला गुंज (अडेनानथेरा पोव्होनिया) (इंडियन कोरल वूड), वड (फिकस बेंगालेनसिस) (बनयान),  पिंपळ (फिकस रिलिजीओसा), कनक चंपावर्ग (ओचना ऑब्टुसाटा), करणी खिरणी (मामिल्कारा हेक्झांडरा) (रायान), पुतरानजीवा रोक्सबर्गील टर्मिनालिया बेल्लिरिका (बेहेडा), टी. कटप्पा (देशी बदाम), कोरडिया डिचोटोमा (गुंडा, भोकर), इक्झोरा ब्राचिआला व टॅमारिंड्रस इंडिका (चिंचेचे झाड, चिंच, इमली) यांसारखी झाडे मोठ्या संख्येने अस्तित्त्वात होती.

  वनस्पती

  येथे किनाऱ्यावर पिलु (सावदोरा पर्सिका) व तवीर (तिवर) (एव्हिसेन्निआ मरिना) ही झाडे आढळून आली होती. समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर नागफणी (पॅच ऑफ ओनुन्टिआ इलॅटर) (बिनकाट्याचा निवडुंग) देखील आढळून आला होता.

  वनस्पती

  खालच्या द्वारापासून वरच्या द्वारापर्यंत डांबरी रस्त्याच्यालगत डिलोनिक्सा रागिया (गुलमोहर), ताम्रशिंबी (पेल्टो फोरम पेट्रोकार्पम), (कॉपर पॉड ट्री), पर्जन्यवृक्ष (समानिया समान) (रेन ट्री) आणि अडेनानथेरा पाव्होनिआ (इंडियन कोरल वूड ट्री) हे वृक्ष सर्वत्र होते. किनाऱ्याच्या लगत असलेल्या डाबरी रस्त्यावर पारोसा पिंपळ (थेसपेसिया पॉपुल्नेआ) व देशी बदाम, जंगली बदाम (टर्मिनालिया कॅटाप्पा) या प्रमुख जाती आहेत.

  वासनवेल (कोक्युलस हिरसुटस) व आँटिगॉन लेप्टोपस् यासारख्या वेली, सामान्यत:
  जमिनीवर तसेच छतावर किंवा वृक्षांवर व झुडपांवर अच्छादिलेल्या दिसतात.
  48 मूळ जातींचे प्रतिनिधित्व करणारी 108 फुलझाडे आणि पुष्पेतर वनस्पती असल्याचे दिसून आले. 108 जातींपैकी 56 झाडांच्या प्रजाती असून 23 विदेशी जाती होत्या.

  फुलपाखरे व किटके

  फुलपाखरे व किटकेफुलपाखरे व किटकेफुलपाखरे व किटकेफुलपाखरे व किटके
  राजभवन ही वास्तू, विविध किटक प्राणीजातींचा आधार आहे.
  येथे क्रेमास्टोगास्टर मुंग्यांचे दोन गोलाकार ग्लोब्युलर (वारुळे) देखील दिसून आली.
  अभ्यास क्षेत्रात लाल मुंग्यांचे (ओकोफिला) एक वारूळ देखील आढळून आले होते. या मुंग्या, लाळेच्या सहाय्याने झाडांची पाने चिकटवून घरटे बांधतात.
  स्पेजिडा गांधील माशांद्वारे घरटे तयार करण्यासाठी रेताड किनाऱ्याचा देखील उपयोग केला जात आहे. बेंबेक्स सल्फ्युरेसेन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधीलमाशा, मातीत बिळे बनवितात, जे उघडे ठेवलेले असते. गांधीलमाशा, त्यांच्या पिलांना उडता येईपर्यंत अन्न पुरवितात. रेताड किनाऱ्यावर अनेक गांधील माशा दिसून आल्या होत्या.
  राजभवन ही वास्तू, विविध किटक प्राणीजातींचा आधार आहे.
  हे क्षेत्र, फुलपाखरांनी समृद्ध आहे. 6 कुळातील फुलपाखरांच्या 35 प्रजाती आढळून आल्या आहेत.

  सागरी कवच

  राजभवन

  मुंबई येथील राजभवन संकुलाच्या सभोवताली तिन्ही बाजुला समुद्र आहे. पश्चिम व दक्षिण बाजुंचा समुद्रतट खडकाळ किनाऱ्यांनी व्यापलेला आहे, तर पूर्वेकडील समुद्रतट अधेमधे खडक असलेला वालुकामय अरुंद किनाऱ्याचा निदर्शक आहे.
  विविध किनाऱ्यातून केलेले शिंपल्यांच्या विविध जिवंत व मृत नमुन्यांचे संकलन, विविध प्रजातींचे दर्शन घडविते.

  उभयचर व सरपटणारे प्राणी

  उभयचर व सरपटणारे प्राणी

  राजभवन संकुलामध्ये उभयचर व सरपटपणाऱ्या प्रजातीची संपन्नता अल्प आहे. सध्या केलेल्या सर्वेक्षणात, 1 टोड, 4 सरडे व 3 सापांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत.
  तेथे सामान्य प्रौढ टोड, ब्युफो मेलॅनोस्टिक्टस दिसून आले नव्हते, परंतु, बागेतील तलावात बेडूक (टॅडपोलेस) दिसून आले होते. तलावात गोड्या पाण्यातील माशांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
  सरड्यांमध्ये, सामान्यपणे बागेतील सरडे, कॅलोटेस व्हर्सिकोलर ही प्रजाती खूपच प्रचलित आहे. ती मुख्यत्वेकरून थेस्पेसिया पॉप्युलेना (पारोसा पिंपळ) आणि डिलोनाईझ रेगिया , पांगारा (एरिथ्रिना व्हेरिएगाटा), तामारिंड्रस इंडिका, फिकस स्प व बारतोंडी (मोरिंडा ब्रॅक्टेटा) या झाडांच्या खोडावर दिसून येतात. बार्क जिक्को (हेमिडॅक्टिलस आयेसचेनाऊल्टी) या झाडांच्या खोडावर क्वचितच दिसतो. स्किंक माब्युया कॅरिनाटा, सुक्या पाल्यापाचोळ्यात सामान्यत: दिसतो.
  राजभवनमध्ये काम करणारे सुरक्षारक्षक व सेवक यांना सर्प दिसल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु, सर्वेक्षणामध्ये सर्प आढळून आले नव्हते. सामान्यत:, नाग (कोब्रा), नाजानाजा, मंदिरा शेजारी खडकाळ भागात दिसून आल्याचे म्हटले जाते आणि रॉक अजगर (रॉक पायथॉन), अजगर मॉल्युरस हे खडकाळ किनाऱ्यालगत असल्याचे कळविले होते. रस्त्याच्या बाजुला खडकांच्या भेगांमध्ये ॲम्फीएस्मा स्टोलाटा या प्रजातींचा कळप आढळून आला होता.
  सर्वेक्षणामध्ये खडकाळ किनाऱ्यावर समुद्री कासव आढळून आले नव्हते.

   

  पक्षी

  पक्षीपक्षीपक्षीपक्षी
  सर्वेक्षणाच्या कालावधील पक्षांच्या छत्तीस (36) प्रजाती व उपप्रजाती दिसून आल्या होत्या.
  ठिपकेदार घुबडाखेरीज, सर्व पक्षांचे आवाज केवळ ऐकू येत असल्याचे दूर्बिणीच्या सहाय्याने निदर्शनास आले आहे.
  येथे गुलाबी लांब शेपटी असलेल्या पोपटांची (रोसेरिग्ड पॅराकीटस्) विपुलता आहे. या सर्वेक्षणात मोराची (पिफाऊल) गणना देखील करण्यात आली.
  एकूण 11 पक्षी अस्तित्त्वात होते, त्यात एका कळपात 1 नर व 8 माद्यांचा समावेश आहे, आणि 2 नर कळपापासून दूर अंतरावर असल्याचे दिसून आले.

  सस्तन प्राणी

  सस्तन प्राणीसस्तन प्राणीसस्तन प्राणीसस्तन प्राणी
  दक्षिण-पूर्व किनाऱ्यावरून अधून-मधून दिसणाऱ्या डॉलफिन्स खेरीज राजभवनात मोठ्या प्रमाणात सस्तन प्राणी नाहीत.
  लहान सस्तन प्राण्यांचे दर्शन देखील दुर्मिळपणे कधीकधीच घडते. या परिसरात वटवाघुळांचा दैनंदिन वावर नाही. तथापि, रात्रीच्या वेळी उडणाऱ्या वटवाघुळांच्या विविध प्रजातींची नोंद करण्यासाठी मिहिका जाल लावण्याची कार्यवाही (मिस्ट नेटींग ऑपरेशन) केली होती.
  कृतंकांच्या विविध प्रजातींची तपासणी करण्यासाठी सापळे देखील लावण्यात आले होते.