बंद

    चमकदार कामगिरीसाठी राज्यपालांचे एनसीसी ला ५०००० रुपयांचे बक्षीस

    प्रकाशित तारीख: February 2, 2020

    नवी दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेले एनसीसीचे प्रजासत्ताक दिन शिबीर तसेच अखिल भारतीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत पुरस्कारांची लयलुट करणाऱ्या राज्यातील एनसीसीच्या चमूला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. महाराष्ट्र एनसीसीच्या ११६ कॅडेट्स व १० अधिकाऱ्यांच्या विजयी चमूच्या सन्मानार्थ राज्यपालांनी राजभवन येथे रविवारी (दि. २) स्वागत समारंभ आयोजित केला होता त्यावेळी राज्यपालांनी सदर पुरस्काराची घोषणा केली. राज्य एनसीसीला यंदा पंतप्रधान निशाण स्पर्धेत दिवितीय सर्वोत्तम संचालनालयाचा पुरस्कार प्राप्त झाला. यावेळी राज्य एनसीसीचे प्रभारी अतिरिक्त महासंचालक ब्रिगेडियर राजेंद्र सिंह धैला, विंग कमांडर विक्रम त्यागरामन तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.**