बंद

  केंद्रीय पथक पाठविण्याचे गृहमंत्र्यांचे राज्यपालांना आश्वासन

  प्रकाशित तारीख: October 31, 2019

  अंतिम दिनांक:31.12.2019

  केंद्रीय पथक पाठविण्याचे गृहमंत्र्यांचे राज्यपालांना आश्वासन

  अवकाळी पाउस, वादळ व अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पीकहानीचा आढावा घेण्यासाठी राज्यात लवकरच केंद्रीय पथक पाठविणार असल्याचे आश्वासन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले.

  राज्यपालांनी गुरुवारी संध्याकाळी अमित शाह यांना फोन करून राज्यात अलीकडेच अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकहानीबद्दल अवगत केले, त्यावेळी शाह यांनी राज्यपालांना उपरोक्त आश्वासन दिले.