बंद

    राज भवन येथे रक्तदान शिबिर संपन्न

    प्रकाशित तारीख: October 20, 2018

    ग्रांट मेडीकल कॉलेज आणि सर ज. जी. समूह रुग्णालयाच्या वतीने शनिवारी (दि.२० ऑक्टो.) राजभवन येथे रक्तदान शिबीर तसेच अवयवदानाबददल जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राजभवनातील अनेक कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी यावेळी रक्तदान केले.

    ज.जी. समूह रुग्णालयातील सामाजिक सेवा अधिक्षक डी. व्ही. कदम यांनी उपस्थितांना अवयव दानाचे महत्व पटवून दिले. अवयवदान करण्यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर करावी लागत नाहीत; केवळ नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अवयव दात्याला संपूर्ण शरीर देखिल दान करता येते, असे त्यांनी सांगितले.

    यावेळी राज्यपालांचे सच‍िव बी वेणूगोपाल रेडडी, उपसचिव रणजीत कुमार, परिवार प्रबंधक वसंत सांळुके तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.