बंद

  ईद ए मिलाद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

  प्रकाशित तारीख: November 9, 2019

  अंतिम दिनांक:31.12.2019

  ईद ए मिलाद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ईद ए मिलाद निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

  प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला ईद ए मिलाद हा सण त्यांच्या प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो. ईद ए मिलादच्या मंगल पर्वावर मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषतः मुस्लिम बंधु – भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.