बंद

  इंदिरा गांधी जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

  प्रकाशित तारीख: November 19, 2019

  अंतिम दिनांक:31.12.2019

  इंदिरा गांधी जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

  मुंबई, दि.१९: देशाच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजभवन, मुंबई येथे श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली. राज्यपालांचे उपसचिव रणजित कुमार यांनी यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

  राज्यपालांचे अवर सचिव (प्रशासन) रमेश डिसोझा यांच्यासह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तसेच राज्य राखीव दलाचे जवान यांनी यावेळी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. दरवर्षी दिनांक १९ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी करण्यात येते.