बंद

  आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची राज्यपालांची घोषणा

  प्रकाशित तारीख: March 26, 2020

  करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी

  आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची राज्यपालांची घोषणा

  राजभवनातील कर्मचारी देखील एक दिवसाचे वेतन देणार

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देण्याचे आज जाहीर केले.

  आपला धनादेश लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  राजभवनातील सर्व अधिकारी व कर्मचारी देखील आपले एक दिवसाचे वेतन करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे राजभवनाकडून आज जाहीर करण्यात आले.
  *****
  राज्यपालांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २१ दिवसांच्या संचारबंदीच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १४ एप्रिल पर्यंत आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.   या कालावधीत जनतेच्या भेटी देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र राज्यपाल आपल्या कर्तव्य पालनाकरीता आवश्यक अभ्यागत तसेच अधिकाऱ्यांना या कालावधीत भेटतील, असे आज राजभवनातून आज जाहीर करण्यात आले.