बंद

  ‘अभया’ला राज्यपालांची कौतुकाची थाप

  प्रकाशित तारीख: November 6, 2019

  अंतिम दिनांक:31.12.2019

  ‘अभया’ला राज्यपालांची कौतुकाची थाप

  राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाला विशेष नाट्यप्रयोग

  ‘अभया’ला राज्यपालांची कौतुकाची थाप

  बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणावरील ‘पोक्सो’ कायद्याबाबत जनजागृती निर्माण करणाऱ्या ‘अभया’ या नाट्यप्रयोगाला आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कौतुकाची थाप दिली.

  ‘अभया’ची प्रमुख भूमिका समर्थपणे पार पाडणाऱ्या चिन्मयी स्वामीचे तसेच लेखिका व दिग्दर्शिका मीना नाईक यांचे राज्यपालांनी विशेष कौतुक केले.

  ‘कळसूत्री’-निर्मित ‘अभया’ या एकल – महिला नाट्याचा ४० वा प्रयोग राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत बुधवारी झाला.

  नाट्यप्रयोगाला ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता व अभिनेत्री श्रेया बुगडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. मनवा नाईक यांनी ‘अभया’ नाटकामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाला राजभवनचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.