31.10.2023 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे अभिवादन
![छायाचित्र उपलब्ध नाही](https://img.youtube.com/vi/LfCcbsJAd1s/mqdefault.jpg)
31.10.2023 : देशाचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ३९ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला देखील उभयतांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त राज्यपालांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.