31.10.2020 : राज्यपालांच्या हस्ते उद्योजक अनिल मुरारका यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
31.10.2020 : प्रसिद्ध उद्योजक, समाजसेवी व लेखक डॉ. अनिल काशी मुरारका यांच्या ‘अनकॉमन ड्रीम्स ऑफ अ कॉमन मॅन’ या चरित्रात्मक कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी राजभवन येथे संपन्न झाले. प्रकाशन सोहळ्याला चरित्र अभिनेते बोमन इराणी, दलिप ताहील तसेच प्रसिद्ध हास्य कलाकार राजू श्रीवास्तव प्रामुख्याने उपस्थित होते.