31.07.2021: राज्यपालांच्या हस्ते नवभारत आरोग्यसेवा सन्मान प्रदान
31.07.2021: नवभारत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित चौथे आरोग्यसेवा सन्मान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या
हस्ते तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत राजभवन येथे प्रदान करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते नेत्रविकार तज्ञ डॉ तात्याराव लहाने, कर्करोग तज्ञ डॉ शैलेश श्रीखंडे, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, नगरसेवक अभिजित भोसले यांना आरोग्य सेवा सन्मान प्रदान करण्यात आले.