31.05.2021 : राज्यपालांच्या हस्ते करोना रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न

31.05.2021 : ठाणे शहर व परिसरातील करोना रुग्णांना मोफत रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात केले. लोकार्पण कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, जय फाउंडेशनचे संस्थापक धनंजय सिंह सिसोडिया, महाराणा प्रताप राजपूत महासंघाचे अध्यक्ष अमर सिंह ठाकूर व श्रीमती लालमंती रामलोचन सिंह प्रामुख्याने उपस्थित होते.