31.03.2022: राज्यपालांच्या हस्ते मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उदघाटन

31.03.2022 : राष्ट्रीय नौवहन दिवस समितीतर्फे आयोजित राज्यभर साजरा केल्या जाणाऱ्या मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाले. यावेळी शिपिंगचे अतिरिक्त महासंचालक कुमार संजय बरियार, मुख्य सर्व्हेयर कॅप्टन एस बारिक, नॉटिकल सल्लागार के पी जयकुमार, उपमहासंचालक डॉ पांडुरंग राऊत, राष्ट्रीय नौवहन दिवस समितीचे अध्यक्ष अतुल उबाळे, भारतीय राष्ट्रीय जहाज मालक संघटनेच्या अध्यक्षा डॉ सुजाता नाईक, नाविक संघटनेचे महासचिव अब्दुल गनी सेरंग, कॅप्टन महेंद्र पाल भसीन, कॅप्टन संकल्प शुक्ल, एस एम राय आदी यावेळी उपस्थित होते.