30.12.2025: राज्यपालांचे रेल्वेने मुंबई येथे आगमन; दिनांक १, २ रोजी नाशिक दौऱ्यावर
30.12.2025: महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज गांधीनगर येथून वंदे भारत एक्सप्रेसने मुंबई सेंट्रल स्थानक येथे आगमन झाले. राज्यपाल देवव्रत दिनांक १ व २ जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर जात असून दिनांक १ रोजी ते सह्याद्री फार्म मोहाडी, दिंडोरी येथे शेतकरी, शेतकरी उत्पादक संघटना, कृषी सहकारी संस्था, कृषी सेवा केंद्र संचालक आदींशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात राज्यपाल आदिवासी आश्रम शाळेला भेट देणार असून शेतकऱ्यांशी बांधावर चर्चा करणार आहेत.