30.09.2024: राज्यपालांची भंडारा येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा
30.09.2024: विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज शासकीय विश्रामगृह, भंडारा येथे विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक, वकील, डॉक्टर्स, पर्यावरण कार्यकर्ते तसेच कला, क्रीडा व संस्कृती क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधला व जिल्ह्य़ातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.
सुरुवातीला जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्यपालांसमोर जिल्ह्याविषयी सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस एम कुर्तकोटी तसेच पोलीस अधिक्षक नूरूल हसन व वरिष्ठ शासकिय अधिकारी उपस्थित होते.