30.09.2023: राज्यपालांच्या हस्ते चौथ्या रत्न व आभूषण प्रदर्शनाचे उद्घाटन
30.09.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे चौथ्या रत्न व आभूषण प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उदघाटन सत्राला ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष सैयम मेहरा, उपाध्यक्ष राजेश रोकडे, माजी अध्यक्ष आशिष पेठे, पु.ना. गाडगीळ आणि सन्सचे सौरभ गाडगीळ, सेन्को गोल्डचे शुभंकर सेन, तसेच रत्न व आभूषण क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी ‘जीजेसी कनेक्ट’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. हे प्रदर्शन दिनांक ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे.