30.05.2026: इस्कॉनच्या भक्तिवेदांत कॉलेज ऑफ वैदिक एज्युकेशनतर्फे विकसित करण्यात आलेल्या समग्र कर्करोग उपचार पुनर्वसन केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन
30.05.2026: इस्कॉनच्या भक्तिवेदांत कॉलेज ऑफ वैदिक एज्युकेशनतर्फे विकसित करण्यात आलेल्या समग्र कर्करोग उपचार पुनर्वसन केंद्र – ‘होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट’चे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज खारघर येथील इस्कॉन मंदिर परिसरात संपन्न झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते संगीतकार शशांक कट्टी यांनी तयार केलेल्या ‘कृष्ण संजीवनी’ या समग्र संगीत उपचार (Holistic Music Therapy) उपक्रमाचे संगीत ट्रॅक्स स्वरूपात लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला इस्कॉन मंदिर खारघरचे अध्यक्ष डॉ. सूर दास, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, भक्तिवेदांत कॉलेज ऑफ वैदिक एज्युकेशनचे संचालक डॉ. वैष्णवांग्री सेवक दास तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.